Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात १ एप्रिलपासून या १० बँकांचे होणार ४ बँकेमध्ये विलिनीकरण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचं संकट असलं तरी बँकाच्या विलिनीकरणाची योजना पुढे ढकलली जाणार नाहीये. ही योजना लवकरच पूर्ण केली होईल. १ एप्रिलपासून ही योजना अंमलात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन असलं तरी देखील बँकांचे विलिनीकरण होण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
अखिल भारतीय बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने (एआयबीओसी) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजपासून कोरोनामुळे विलीनीकरण प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
प्रस्तावित विलीनीकरणानुसार, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत, सिंडिकेट बँकचं विलिनीकरण कॅनरा बँकेत, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ इंडियामध्ये तर अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेत होणार आहे.





