Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धारावीत कोरोनाचे ६ रुग्ण

धारावीत गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत असले तरी शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला. नवीन सहा रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ६० वर्षांच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांचा आकडा २२० वर गेला असून १४ मृत्यू झाले आहेत. दादरमध्ये ७३ वर्षांच्या एका पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे दादरमधील रुग्णांची संख्या २९ झाली आहे. तर माहीममध्ये ८६ वर्षांची एक महिला बाधित झाली आहे.





