Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: ‘त्या’ पोलीस शिपायाचा करोनामुळे मृत्यू

राज्य दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलीस हवालदार दिलीप पाटील यांचा मृत्यू करोना संसर्गाने झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. नागपाडा पोलीस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पाटील यांना विषमज्वर होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र १७ मेला मध्यरात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल करून उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.





