breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: तब्बल सव्वा लाख बेकायदेशीर मास्कचा साठा जप्त

सध्या देशभरासह राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये मुंबईचा अव्वल क्रमांक आहे. सरकार पातळीवर करोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. देशभरात जमाव बंदीसह लॉक डाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना मास्कच्या वापर करण्याबरोबरच हात सॅनिटायझरने धुण्याचा सूचना दिल्या जात आहे. परिणामी या दोन्ही वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 21 मार्च रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांची किंमत देखील नमूद केली आहे. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत.

मात्र असे असूनही मुंबईतील नागपाडा येथील मदनपुरा परिसरात आकीब मोहम्मद कासिम अन्सारी हा  युवक कोणताही अधिकृत परवाना किंवा कागदपत्र नसताना जास्त दराने मास्कची करत होता. शिवाय त्याने 3 प्लाय सर्जिकल मास्कचा मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीररित्या साठा देखील करून ठेवला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली होती. या वरून संबंधित ठिकाणी छापा मारून  30 लाख 52 हजार 500 रुपये एकुण किंमत असलेल्या तब्बल 1 लाख 22 हजार 100  मास्कचा साठा जप्त करण्यात आला व या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, पोलीस उप आयुक्त शहाजी उमाप, सहायक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सपोनि गजानन भारती, पोलीस उप निरीक्षक नवनाथ उघडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button