Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
काँग्रेसला चांगले बघवत नाही – भाजप
मुंबई |
दुसरी लाट काँग्रेसशासित राज्यांमधून सुरू झाली आणि अधिक तीव्र होती. याच राज्यांमध्ये लसीकरणाचा वेग कमी असून देशी बनावटीच्या लशीला विरोध केला गेला, असा तीव्र प्रतिवाद भाजपने केला. देशात चांगले घडत असलेले काँग्रेसला सहन होत नाही, त्याविरोधात लगेच राहुल गांधी प्रश्नचिन्ह उभे करतात. पंजाबमधील लस घोटाळ्याबाबत राहुल यांनी मौन का बाळगले आहे? असे भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा म्हणाले.





