Tata कंपनीचा 15000 कोटी रुपयांचा आयपीओ टाटा कॅपिटल आणण्याचा निर्णय
टाटा सन्सजवळ टाटा कॅपिटलचा 93% भाग ,. मागील सहामाहीत त्यात 21% वाढ झाली आहे.

मुंबई : शेअर बाजारात सध्या भूकंप सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून सेन्सेक्सला उतरती कळा लागली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम दलाल स्ट्रीटवर झाला आहे. बाजारातील या परिस्थितीत टाटा कंपनीने चांगले पाऊल उचलली आहे. टाटा ग्रुपची फायनान्स कंपनीन टाटा कॅपिटलने आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेबीने सीक्रेट फायलिंग केली आहे. 15000 कोटी रुपयांचा आयपीओ टाटा कॅपिटल आणणार आहे.
कंपनीच्या बोर्डाची आयपीओसाठी मंजुरी
टाटा कॅपिटलने 15000 कोटींचा आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे आपली कागदपत्रे जमा केली आहे. त्यामध्ये नवीन शेअर जारी करण्यात येणार आहे. टाटा सन्ससुद्धा आपला भाग विकणार आहे. टाटा सन्सजवळ टाटा कॅपिटलचा 93% भाग आहे. कंपनीने आयपीओ आणण्यासाठी बोर्डाची मंजुरी घेतली आहे. कंपनी 2.3 कोटी नवीन शेअर जारी करणार आहे. तसेच काही जुन्या शेअरहोल्डरला आपले शेअर विकणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती कळवली.
हेही वाचा – असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पुणे आणि महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्यात ऐतिहासिक वेतन करार
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, टाटा सन्स आणि टाटा कॅपिटलला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणे गरजेचे आहे. त्याच आधारावर आरबीआय अपर लेअर एनबीएफसी मान्य करते. नॉन बँकींग फायनान्स कंपनी म्हणून टाटा कॅपिटलला आयपीओ आणण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यात नवीन शेअर दिले जाणार आहे. तसेच काही विद्यामान शेअर धारकांना ऑफर ऑफ सेल दिले जातील.
अशी झाली आर्थिक प्रगती
टाटा कॅपिटल, टाटा समूहची आर्थिक सेवा क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. तसेच टाटा सन्सची सहायक कंपनीसुद्धा आहे. ती गैर बँकींग वित्तीय कंपनी म्हणून कारभार करते. कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2025 मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये टाटा कॅपिटलने 18,178 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. तो आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत 34% जास्त होता. कंपनीच्या लोन बुकमध्ये 40% वार्षिक वाढ आहे. कंपनीची लोक बुक एक लाख कोटीच्या पुढे गेली आहे. कंपनीचा नफा 3,150 होता. मागील सहामाहीत त्यात 21% वाढ झाली आहे.