दिलासादायक!राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरली – डॉ. प्रदीप आवटे
![Comfortable! The third wave of corona in the state has subsided - Dr. Pradeep Awate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/E7uyWYwVkAIFJK6_.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यासह शहरात सुरु असलेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आता टळले आहे. राज्यातील कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. राज्याचा कोरोना बाधितेचा दर आता 35 टक्क्यांवरून थेट 2 .2 टक्क्यांवर आला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य सर्वैक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. याबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला सर्व व्यवहार पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्याचे आदेश पात्र लिहून दिले आहेत.मात्र हे सांगता असताना त्या त्या ठिकाणच्या कोरोना बाधितांचा अदनाज घेऊन स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा व त्यानुसार निर्बंध लादण्यास सांगण्यात आले आहे.
राज्याला ओमिक्रोनाचा धोका नाही..
मागील आठ दिवसातपासून रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली आहे.राज्यातील बाधितांची साप्ताहिक दर २.२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे जवळपास राज्यातील कोरोनाची तिसरी लाटा ओसरताना दिसत आहे. राज्याला ओमिक्रोनाचा धोका नाही. त्यामुळे त्यानुसार आपल्या राज्याची टास्कफोर्स व राज्य सरकरा कोरोनाच्या निर्बधाबाबत योग्य तो निर्णय घेईल. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट अत्यंत सौम्य होती. लागणं झाल्यानंतरही अनेक रुग्णांना रुग्णालयात भरती होण्याची गरज पडली नाही. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं होत.
रुग्णसंख्येतही घट…
पुणे शहरातही कोरोनाच्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. शहरतीला कोरोना बाधितांचा दर हा 22 टक्क्यावरून 7 टक्क्यांवर आला आहे. जिल्हा पालकमंत्र्याच्या मागील बैठकीतही शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टी विचार सुरु असलयाची माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेत नव्याने उद्भवलेल्या ओमिक्रॉनच्या धोकाही सद्यस्थितीला टळलेला आहे. कारण यांच्या रुग्णसंख्येतही बरीच घट झाली आहे. तसेच नवीन रुग्णही आढळण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.