TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

BEST कर्चमाऱ्यांनी अचानक पुकारला संप

मुंबईमधील सांताक्रुझ बस डेपोमधील ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. पहाटे पाच वाजल्यापासून अचानक हा संप सुरु झाला आहे. या संपामुळे सांताक्रुझ बस डेपोमधून एकही बस निघालेली नाही. त्यामुळेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईकरांना या संपाचा फटका बसण्याची चिन्हं दिसत आहे. कंत्राटी कामगारांनी योग्य वेतन, दिवाळी बोनस आणि प्रवास भत्ता देण्याच्या मागणीबरोबरच कामावर रुजू होण्यासंदर्भातील नियुक्ती पत्रं द्यावीत अशी मागणी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

सांताक्रूज बेस्ट डेपोमध्ये ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पहाटे कामावर रुजू न होता बोनसच्या मुद्द्यावरुन संप पुकारत असल्याची घोषणा केली. नेहमीप्रमाणे पहाटच्या शिफ्टसाठी कामगार बस डेपोमध्ये आले मात्र एकही बस डेपोमधून बाहेर पडली नाही. “आम्हाला पगार जेवढा सांगितलेला तो पूर्णपणे मिळत नाही. आम्ही सुट्ट्यांना पण काम करतो त्याचा पगारही मिळत नाही. सामान्यपणे सुट्ट्यांच्या दिवशी काम केल्यावर दुप्पट पगार मिळतो. मात्र आम्हाला आहे तो पगारही दिला जात नाही. तसेच आम्हाला तिकीटही मोफत नाही,” असं संपकरी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तसेच दिवाळी बोनसही मिळालेला नसल्याचं सांगतानाच अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांना कबूल केलेलं वेतनही मिळत नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार चालकांना २३ हजार पागर सांगून १८ हजार पगार दिला जात आहे. त्यामुळेच आमची पगारवाढ झाली पाहिजे अशी मागणी संपकरी कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. वाहक म्हणजेच कंडक्टरला १८ हजार ५०० रुपये पगार सांगितलेला. मात्र हातात १२ हजार ६०० पगार येतो. नोकरी देताना सहा तास काम करायचं सांगितलं होतं मात्र काम आठ तासांहून अधिक होते. त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही अशी तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.

रोज सांताक्रुझ बस डेपोमधून १०० बस सुटतात. मात्र आज या संपामुळे अद्याप एकही बस येथून सुटलेली नाही. सध्या वरिष्ठ अधिकारी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा करत आहेत. मात्र पहाटे पाचपासून संप सुरु असतानाच साडेतीन तासांनंतर अधिकाऱ्यांना जाग आल्याचा आक्षेप घेत कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या बस डेपोबाहेर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button