TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणून डॉ. नितीन रिंढे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणून डॉ. नितीन रिंढे, तसेच इतिहास संशोधन मंडळाचे संचालक म्हणून डॉ. दीपक पवार यांनी पदभार स्वीकारला आहे.
रिंढे हे वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख आहेत. विचक्षण लेखक, समीक्षक, संशोधक म्हणून ते विख्यात आहेत. तसेच आज इतिहास संशोधन मंडळाचे संचालक म्हणून नियुक्त झालेले विख्यात अभ्यासक डाॅ.दीपक पवार यांनीही पदभार ग्रहण केला.दिपक पवार हे मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख,मराठी अभ्यास केंद्र या मराठी भाषाविषयक चळवळीचे अध्यक्ष आहेत.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी दोन्ही संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा देताना विश्वास व्यक्त केला की, “या संशोधन विषयांशी जास्तीत जास्त तरूण मंडळी जोडली जातील आणि समृद्ध अभ्यासक पुढील काळात आपल्या माध्यमातून तयार होतील ..”
” डाॅ. प्रदीप कर्णिक यांनी आपल्या कार्यकालात उंचावर नेऊन ठेवलेले अमृतमहोत्सवी मराठी संशोधन मंडळ ,आणखीनवनवीन तसेच प्रकाशझोतात न आलेल्यसंशोधन क्षेत्रात उत्तम प्रगती करेल.
इतिहास संशोधन मंडळही भरीव योगदान देईल” असा विश्वास याप्रसंगी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी व्यक्त केला. मराठी संशोधन मंडळाचे कोषाध्यक्ष डाॅ. प्रदिप कर्णिक व मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोंजाळ यांनी शुभेच्छांसह मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मराठी संशोधन मंडळाचे सदस्य अरुण नेरुरकर, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यवाह उमा नाबर, कार्यकारिणी सदस्य स्वप्नील लाखवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button