Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अखेर २६ दिवसांनी आर्यन खान तुरुंगाबाहेर; मन्नतपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी
![Aryan Khan finally out of jail after 26 days; Crowds on both sides of the road leading to Mannat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/20211030_114245.jpg)
मुंबई – ड्रग्स प्रकरणात गेल्या २६ दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खान आज अखेर तुरुंगाबाहेर आला आहे. त्याला गुरुवारी जामीन मंजूर झाला होता. मात्र प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्याला बाहेर पडण्यात वेळ लागला.
बॉलिवूड चा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रुझ ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून सध्या बरेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच त्याचा जामीन अर्ज स्विकरण्यासही उशीर झाला. अखेर २६ दिवसांनंतर त्याला जामीन मिळाला आहे. गुरुवारी त्याला जामीन मिळाला आणि आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.