ताज्या घडामोडीमुंबई

अजितदादांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई  | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर महाविकास आघाडीचे नेते जोरदार टीका करतायत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर रंग बदलणारा सरडा म्हणत राज ठाकरेंचा समाचार घेतला. क्षणाक्षणाला रंग बदलणारा जातीयवादी माणूस म्हणत अजितदादा राज ठाकरेंवर तुटून पडले. अजितदादांच्या टीकेला मनसेमधून आणखी कुणी उत्तर दिलेलं नाहीय. मात्र ही टीका भाजपला खूपच झोंबली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी थेट पवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे.

पण शरद पवार यांच्या भूमिकांचं काय?, असं म्हणत त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला पवारांच्या राजकीय भूमिकांचे दाखवे देऊन केशव उपाध्ये यांनी रोकडा सवाल केलाय. यावेळी उपाध्ये यांनी Cतब्बल ४३ वर्षांचा इतिहास मांडताना पवारांनी कोणत्या काळात कोणती भूमिका घेतली, जी आधीच्या भूमिकेशी कशी विसंगत होती, हे दाखवण्याचा उपाध्येंनी प्रयत्न केला आहे.

केशव उपाध्येंकडून पवारांच्या बदलत्या भूमिकांचे दाखले

◾️ १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.
◾️ पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली.
◾️ पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली.
◾️ २०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले.
◾️ बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं.
◾️ पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत?

दरम्यान, राज ठाकरेंवरील टीकेला उत्तर देण्यासाठी भाजप नेता सरसावल्याने आता उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सेना-राष्ट्रवादीवर हल्ला चढवला तर दुसऱ्या बाजूला भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवताना मोदी-शहा-फडणवीसांविरोधात एकही शब्द काढला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संभाव्य मनसे-भाजप युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

भाजप-मनसे युतीची चर्चा

मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंना भेटणार आहेत. या भेटीत संभाव्य युतीबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फडणवीस राज ठाकरेंना भेटणार

“राज ठाकरे आणि माझी भेट होणं काही आश्चर्याची गोष्ट नाहीय. आमचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आमची भेट झाली तर आश्चर्य काय आहे?”, असं फडणवीस म्हणाले. त्यावर भेटीत मनसे-भाजप युतीवर चर्चा करणार का?, असा सवाल पत्रकारांनी विचारताच, “भेटल्यानंतर काय बोलायचं ते आम्हाला ठरवू द्या”, असं म्हणत येणाऱ्या काही दिवसांत राज ठाकरेंना भेटून पुढील सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केलंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button