ताज्या घडामोडीमुंबई
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कारचा चुराडा; पाच जणांचा जागीच मृत्यू
![Accident on Mumbai-Pune highway, car crash; Five died on the spot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/mumbai-pune-accident-1.webp)
मुंबई | मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्येएका कारचा चुराडा झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये धडक झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिलाटणे गावाजवळ ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना कारचालकाचं कारवरचं नियंत्रण सुटलं. शिलाटणे गावाजवल महामार्गावर ही कार दुभाजक ओलांडून पलीकडच्या दिशेला गेली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली. या अपघाताचा तडाखा इतका भीषण होता की यामध्ये कारचा पूर्णपणे चुराडा झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.