breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गुंतवणूकदारांना मोठा फटका, शेअर बाजार सुरू होताच कोसळला

मुंबई | प्रतिनिधी 

शेअर बाजारातील घसरणीचं सत्र आजही कायम होतं. आज शेअर बाजार सुरू होताच पडझडीला सुरुवात झाली. याचा गंतवणूकदारांना मोठा फटका बसला. आज बीएसई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रातच तब्बल 700 अकांनी कोसळला, तर निफ्टीमध्येदेखील 200 अकांची घसरण झाली.

आशियाई शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. आता याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे. परंतु पुढील आठवड्यात शेअर मार्केटमध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आज सर्वाधिक फटका हा टायटनच्या शेअरला बसला. टायटनच्या शेअरची किंमत जवळपास तीन टक्क्यांनी कमी झाली. तर एचयूएएल, मारूती, एशियन पेंट्स आणि इंडसलँड बँकेचे शेअरदेखील कोसळले. तर दुसरीकडे मात्र इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्राच्या शेअरमध्ये वाढ झाली.

दरम्यान, गुरुवारीदेखील शेअर बाजारात घसरण सुरूच होती. गुरुवारी शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 319.82 अकांच्या घसरणीसह 57,581.32 वर बंद झाला होता. तर निफ्टीमध्येदेखील 91 अकांची अर्थात 0.53 टक्क्यांची घसरण होऊन निफ्टी 17,157.40 अंकांवर बंद झाला होता. शेअर बाजारामध्ये सध्या सातत्याने असा चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असा सल्ला शेअर मार्केट तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button