TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गोवरच्या रुग्णांत १७ पटीने वाढ

मुंबई : सप्टेंबरपासून मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईतील रुग्णांच्या संख्येत तब्बल १७ पटीने वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत गोवरचे १६४ रुग्ण सापडले असून, गतवर्षी ही संख्या ९ होती. मुंबईमध्ये सप्टेंबरपासून गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ताप आणि पुरळाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात दिसून आले. त्यापैकी काही जणांना गोवरची लागण झाली. मुंबईतील गोवरच्या रुग्णांच्या संख्येतील वाढ ही मागील दोन वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. यंदा सप्टेंबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.

मुंबईमध्ये ताप आणि पुरळचे १,०७९ रुग्ण आढळून आले. त्यातील १६४ जणांना गोवरची लागण झाली आहे, २६ ऑक्टोबरपासून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू गोवरामुळे झाल्याचा संशय आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या १७ पटीने अधिक आहे. गतवर्षी मुंबईमध्ये ताप आणि पुरळचे ४०८ रुग्ण आढळले होते. त्यातील ९ जणांना गोवरची लागण झाली होती. तसेच २०२० मध्ये मुंबईत २७९ रुग्ण ताप आणि पुरळ असलेले सापडले होते. यातील २५ रुग्णांना गोवरची लागण झाली होती. गोवराच्या रुग्णांचे प्रमाण २०२०मध्ये २०२१ च्या तुलनेत अधिक असले तरी २०२२ च्या तुलनेत ६ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

१ ते ४ वयोगटातील रुग्ण अधिक बाधित

जानेवारीपासून आतापर्यंत मुंबईमध्ये गोवरामुळे बालकांच्या अंगावर दिसणारे पुरळ आणि ताप आल्याचे १०७९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यात १ ते ४ वयोगटातील बालकांचे प्रमाण अधिक आहे. १ ते ४ या वयोगटात सर्वाधिक ५६० संशयित रुग्ण आहेत. त्याखालोखाल ५ ते ९ वयोगटातील १८७ बालकांची संशयित रुग्ण म्हणून नोंद झाली आहे. तसेच ० ते ८ महिने या वयोगटातील १३२ रुग्ण, ९ ते ११ महिने १३८, १० ते १४ वर्षे ५०, १५ वर्षे आणि त्यावरील १२ रुग्ण असे एकूण १०७९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ६६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील ५ मुलांना कृत्रिम प्राणवायू देण्याची आवश्यकता भासत आहे.

मुंबईत १६४ बालकांना लागण

  • गोवर रुग्णांच्या संख्येत बुधवारी वाढ झाली असून आतापर्यंत १६४ बालकांना गोवरचे निदान झाले आहे. ताप तसेच पुरळ असलेल्या रुग्णांची संख्या १,२६३ झाली आहे. तसेच बुधवारी २९ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  
  • गोवरचा मुंबईतील वाढता उद्रेक पाहता २४ प्रभागांमध्ये सर्वेक्षणासह इतर आरोग्य नियोजनासाठी ४७० आरोग्य स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुंबईमध्ये आतापर्यंत १३ लाख ४९ हजार १३२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये एम पूर्व विभागातील घरांची संख्या १ लाख ३३ हजार ३९७ इतकी आहे. बुधवारी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईमध्ये १८४ नवे संशयित रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या १२६३ इतकी झाली आहे. तसेच बुधवारपर्यंत २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 
  • लसीकरणाचा प्रतिसाद वाढावा यासाठी मायकिंगद्वारे गोवर लसीकरण व अतिरिक्त लसीकरणासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. धर्मगुरु व खासगी डॉक्टरांना नियमित लसीकरणाचे फायदे, गोवर आजाराविषयी, ताप व पुरळ असलेल्या रुग्णांना जीवनसत्व अ घेण्याचे महत्त्व सांगण्यात येत आहे. भिवंडी, मालेगावात चिंता  गेल्या महिनाभरात भिवंडी शहरात ३७ रुग्ण तर, ठाणे शहरात १० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. मालेगाव परिसरात १०१ लहान बालकांना गोवरचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button