पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी, तर आयसीआयसीआयला ३० लाख दंड
![1.80 crore to Punjab National Bank and Rs. 30 lakh to ICICI Bank](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/RBI-2.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी पंजाब नॅशनल या सरकारी बँकेला १ कोटी ८० लाख आणि आयसीआयसीआय या खासगी बँकेला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. या दोन्ही बँकांनी आरबीआयच्या नियमांचा भंग केल्याचे आढळले होते. त्यानंतर आरबीआयने त्यांच्यावर ही कारवाई केली.
पंजाब नॅशनल बँकेचे ३१ मार्च २०१९ नंतरचे व्यवहार तपासण्यात आले. त्यात बँकेने आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. जुलै २०२० आणि आर्थिक वर्ष २०१९-२० मधील बँकेची कागदपत्रे आरबीआयने तपासली. त्यात बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. त्यामुळे बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र या नोटिशीला बँकेने दिलेल्या उत्तराने आरबीआयचे समाधान झाले नाही. म्हणून आरबीआयने बँकेला १ कोटी ८० लाखांचा दंड ठोठावला. आयसीआयसीआय या खासगी बँकेनेही आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे या बँकेलाही ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. आरबीआयने आजवर अनेक बॅंकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे.