सोन्याने गाठला उच्चांक! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव तब्बल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images-2.jpeg)
मुंबई: सराफा बाजारात गेल्या पाच दिवसात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव तब्बल सोडतीन हजाराने वधारला आहे. सोन्याने आज मागील सर्व रेकॉर्ड मोडत सराफा बाजारात 56 हजार 191 रुपये प्रतितोळा इतका उचांक गाठलेला आहे. तर चांदीचे भावही गगनाला भिडले आहेत. आज चांदीचा भाव 73 हजार प्रतिकिलोवर पोहोचला आहे.
गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात साडेतीन हजाराने वाढ
गेल्या पाच दिवसात सोन्याच्या भावात साडेतीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता. 6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला आहे. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला आहे.