breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सरकारविरोधात संताप व्यक्त करत डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई – डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत सरकारविरोधात संतात व्यक्त केला आहे. कोरोना काळात अडीच लाखांपेक्षा जास्त डॉक्टरांनी सेवा दिली. मात्र त्यांना सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा करत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेतली.

कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र कोरोनाने बळी गेलेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे आतापर्यंत 147 डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टरांनी सांगितले, ‘जून महिन्यात आमच्या एका सहकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. ते लॉकडाऊनमध्ये सतत सेवा देत होते. आम्ही अर्ज केला असता तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही असे सांगण्यात आले. तुम्ही स्वत:च्या खासगी दवाखान्यात काम करत होता आणि याचा कोविडशी काही संबंध नाही, असे नाकारलेल्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. हे फार निर्दयी प्रकारचे स्टेटमेंट आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलो आहोत.’

दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधी वीज बिलांविरोधात, जिम आणि धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आवाज उठवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button