Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/lad-on-shivsena-.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्याता ठाकरे सरकार स्थापन झाल्यापसून शिवसेना-भाजपमधील यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. तर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर विविध मुद्यावरून टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नाही. दरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधलेला आहे.
लाड यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठा बाणा विसरले असून, आता ते इतिहास सुद्धा विसरलाय सांगत असल्याचा आरोप लाड यांनी केलेला आहे.