शेअर बाजारात जोरदार तेजी
![The stock market plunged, the Sensex plunged by a thousand points](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/shear.jpg)
मुंबई – गेल्या चार दिवसांपासून घसरण होत असलेल्या मुंबई शेअर बाजारातील घसरणीला आज ब्रेक लागला. जागतिक स्तरावरून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजारात सकाळी तेजीचे वातावरण होते. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक ५०४ अंकांनी आणि निफ्टी १४० अंकांनी वाढला होता. तेजीच्या या बाजारात आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची मात्र पडझड झाली होती.
सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरण झालेल्या मुंबई शेअर बाजारात आज सकाळी तेजीचे वातावरण होते. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक ३७ हजारांच्या वर गेला होता. जोरदार तेजी आल्यामुळे निफ्टीनेही १० हजार ९८२चा टप्पा ओलांडला होता. चार दिवसांच्या घसरणीला त्यामुळे ब्रेक लागल्याने ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण होते. झी एंटरटेन, एचडीएफसी बँक, रिलायन्स, हिरो मोटोकॉर्पो आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांमध्ये तेजीचे वातावरण होते. तर इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, विप्रो आणि ग्रासिम यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती.