Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

धक्कादायक : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. आमदार, नगरसेवक, महापौर असे लोकप्रतिनिधींही कोरोना बाधित होत आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची बाधा झाल्याचे बातमी समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनामुळे शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर सायंकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांना धक्का बसला आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हटले आहे की, थोडासा ताप आल्याने मी माझी COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button