शिवसेना महाराष्ट्र द्रोह का करते – आशिष शेलार
![CBI probe Anil Parab's conversation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/Aashish-Shelar-.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील विविध निर्णयांवर आणि कामांवर सत्ताधारी आणि विरोधक पेटल्याचं पाहायला मिळतं. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना महाराष्ट्र द्रोह का करत आहे ? असा सवाल करत ठाकरे सरकारला विकासकामाचं काविळ झालं आहे असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
मेट्रोच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. ज्या अर्थी बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्लॅन आहे. तिथेच ठाकरे सरकार मेट्रोबाबतीत गंभीर नसल्याचं समोर येतं. यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या निक्रियतेमुळे मुंबईत आर्थिक केंद्र झालं नाही. फडणवीस सरकारने आर्थिक केंद्र बीकेसीत करण्याचं प्रस्तावीत केलं पण ठाकरे सरकारने त्यामध्ये खोडा आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.इतंकच नाही तर लडकवण भटकवण झडकवण अशी ठाकरे सराकरची शैली आहे असं म्हणत शेलारांनी ठाकरे सरकारला थेट सावल केले. यावेळी बेस्टचं खाजगीकरण करून मुंबईकरांना बैलगाडी देणार का ? मुंबईकरांच्या खिशाला आधिक भार देण्याचं काम ठाकरे सरकारचं असून ठाकरे सरकारला विकासाचं कावीळ झालं आहे अशीही टीका आशिष शेलारांनी केली आहे.