Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
शिवसनचे आमदार डॉ.बालाजी किनिकर यांना कोरोनाची लागण

अंबरनाथ – राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अगदी सर्वसामान्यापासून राजकीय मंडळींनासुद्धा कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतचं अंबरनाथ मधील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अंबरनाथ विधानसभा आमदार डॉ.बालाजी किणीकर हे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. त्यांना मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
डॉ.किणीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने, त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन घशातील स्वॅब कलेक्शनची रॅपिट टेस्ट करून घेतली. त्यात कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले, असे सांगितल्यानंतर अधिवेशनात जाणे योग्य नसल्याचा विचार करून डॉ.बालाजी किणीकर मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले जात आहे.





