breaking-newsमुंबई

शरद पवारानी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीत कशावर चर्चा झाली याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीनंतर राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. असं असलं तरी शरद पवार यांनी याआधी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट अशीच होती की वेगळी हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील होते. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती. त्यामुळे त्या भेटीबद्दलही मोठी चर्चा झाली होती.

याआधी शरद पवार यांनी ठाकरे स्मारकावर देखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभाग घेत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. ही बैठक नियमीत बैठक असल्याचं आणि त्यात महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याचंही त्यावेळी सांगण्यात आलं. आर्थिक गोष्टींना चालना देण्याविषयी आणि लॉकडाऊनच्या पुढील टप्प्यात काय शिथिलता देता येईल, याबाबतही बैठकीत चर्चा झाली होती.

दरम्यान, देशभरात लॉकडाऊन 5 ची देखील घोषणा झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button