Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
विधानपरिषद उपसभापती पदासाठी सेना आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल
![Excitement over finding 10 corona positive in winter session!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Maharashtra-Vidhansabha.jpg)
मुंबई | आजपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा उद्याचा दुसरा दिवस असणार आहे. विधानपरिषद उपसभापती कोण निवडून येणार याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अशातच या निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे.
विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने देखील पुढाकार घेतला आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावले आहे. काही आमदार हे आज अधिवेशनाला अनुपस्थित होते. तर भाजपच्या २ आमदारांना कोरोनावर लागण झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे.