Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी उद्या होणार निवडणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/vidhan-parishad-6.jpg)
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज सहा महिने बंद होते. आज (७ सप्टेंबर) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. आता यासाठी उद्या (८ सप्टेंबर) निवडणूक होणार आहे, तशी घोषणा विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
सध्या महाविकासआघाडीतील आमदारांची संख्या बघता पुन्हा निलम गोर्हेंना पुन्हा संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस हा वादाचा ठरला आहे.