वारली चित्रकार जिव्या म्हसे यांचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/jivya-somma.jpg)
पालघर : वारली चित्र कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे,पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले देशातील पहिले आदिवासी चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यातील गंजाड गावात राहणारे जिव्या सोमा म्हसे यांचा जन्म १९३३ साली झाला असून आज सकाळी त्याच्या राहत्या घरी झोपेत वृद्धापकाळाने निधन झाले.
रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी म्हसे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला. परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली आहे. १९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी म्हसे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली.