breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
वरळी पोलीस कॅम्पात कोरोनाची’हजेरी’
मुंबई | कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून, त्यांनी इमारत सील केली आहे.
दरम्यान, या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा व्यक्ती व्हीव्हीआयपी व्यक्तींकडे सुरक्षेसाठी तैनात असायचा. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने धाकधूक वाढली आहे. या रुग्णाला 20 मार्चपासून ताप येत होता. तर त्यांच्या पत्नीला काल रात्रीपासून ताप येत असल्याने पत्नीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या दाम्पत्याने दोन मुले आहेत. या मुलांना सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंन्टाईन करण्यात येणार आहे.