Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus|नांदेडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई

नांदेड | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवासोडून बाकी सर्व बंद करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन असतानाही काही लोक नांदेडमध्ये वाहतूक नियमाचे उल्लघंण करत होते. त्यामुळे पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत दहा दिवसात तब्बल 53 लाख रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात काहीजण विना परवाना वाहन चालवत होते. विना परवाना वाहन चालवणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच विनाकारण फिरणारे महाभागही मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे नांदेड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.





