वडील जिवंत असताना दुसऱ्या लग्नाच्या मुलांचा मालमत्तेवर हक्क नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bombay-high-court.jpg)
- हायकोर्टाचा निर्वाळा
मुंबई – दुसऱ्या लग्नापासून झालेली मुले ही वडील जिवंत असताना त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती शालीनी फणसाळकर जोशी यांनी हा निर्वाळा देताना पित्याच्या मृत्यूनंतरच ही मुले मालत्तेवर हक्क सांगू शकतात, असेही स्पष्ट केले.
दुसऱ्या लग्नापासुन जन्माला आलेल्या मुलाने पिताच्या मालमत्तेवर दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होता. त्या याचिकेवर न्यायमूर्ती शालीनी फणसाळकर जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली.यावेळी याचिकाकर्त्यांने वडील हयात असताना याचिकादार मुलाने त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा मागितला होता. त्याला पहिल्या लग्नापासुन झालेल्या मुलांनी मालमत्तेच्या वाटणी करण्यास जोरदार आक्षेप घेतला.
वडील जिवंत असताना वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी करता येणार नाही, असा दावा केला. हा दावा न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी मुंबई उच्च न्यायालयासह अन्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत वडील हयात असताना दुसऱ्या लग्नापासुन जन्म झालेल्या मुलांना मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही, असे स्पष्ट केले.