लॉकडाऊनमध्ये मंत्री बंगल्यावर राहिलेच नाही तर त्यांना वीज बिल कसले ? : छगन भुजबळ
मुंबई । प्रतिनिधी
कोरोना व्हायारस संकटाच्या काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिक भरमसाठ वीज बिल आल्याने वैतागला असताना, दुसरीकडे या काळात १५ मंत्र्यांना विजेची बिल पाठवण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे.
मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये भरमसाठ बिल पाठवले. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना याच लॉकडाउन कालावधीतील 4 ते 5 महिन्यांची विद्युत देयकेच पाठविली नसल्याचा प्रकार उघकीस आला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाल की, मंत्र्यांना बंगल्याचे वाटप झाले आणि लगेच कोरोनाची साथ आली. अनेक मंत्री त्यांना मिळालेल्या बंगल्यात राहायलाच गेले नसतील. या काळात मंत्री बंगल्यांवर राहिलेच नाही तर त्यांना विजेचे बिल येणार कसे ?
विधान परिषदेतील विरोधी पक्ष प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका केली असून, जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा असल्याचे म्हटले आहे.