Breaking-newsमुंबई

रुग्णांच्या घरच्या घरीच होणार वैद्यकीय चाचण्या

मुंबई – ज्येष्ठ नागरिक, अशक्त आणि अंथरूणाला खिळलेले रुग्ण ज्यांना मुंबई पालिकेच्या रुग्णालयांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशा रुग्णांच्या घरीच विनामूल्य वैद्यकीय चाचण्या होणारा आहेत. आपली चिकित्सा या योजनेअंतर्गत लवकरच विनामूल्य चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे अनेक वैद्यकीय तपासण्यांसाठी संबंधित विभागांमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा असतात. अनेकदा ज्येष्ठ नागरिक किंवा अशक्त रुग्णांना या रांगेत उभे राहणे शक्य होत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चाचण्या करून न घेताच लोक माघारी परततात. तसेच अंथरूणाला खिळून असलेल्या रुग्णांना  चाचण्या करण्यासाठी रुग्णालयात येणे शक्य नसते. आर्थिक परिस्थितीही बेताची असल्याने असे रुग्ण खासगी डॉक्टरांकडूनही चाचण्या करून घेत नाहीत. अशा वेळी या रुग्णांच्या आजाराचे वेळेत निदान होत नाही आणि त्यांचा आजार बळावण्याची दाट शक्यता असते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button