रिझव्र्ह बँकेला दोष देऊ नका; अन्यथा आणखी नुकसान!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/high-court-bombay-Frame-copy-1.jpg)
महाईन्यूज | मुंबई
- ‘पीएमसी’ खातेधारकांना उच्च न्यायालयाने सुनावले
पीएमसी बँक गैरव्यवहाराप्रकरणी खातेधारकांना होत असलेल्या त्रासासाठी रिझव्र्ह बँकच जबाबदार आहे. शिखर बँकेच्या निष्काळजीपणामुळेच खातेधारकांचे पैसे बुडाले, असा आरोप करणाऱ्या खातेधारकांना उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा सुनावले लगावली. रिझव्र्ह बँकेला दोष देऊ नका, याचा पुनरूच्चार करताना रिझव्र्ह बँकेने वेळीच हस्तक्षेप केला नसता आणि पैसे काढण्याच्या मर्यादेवर निर्बंध घातले नसते तर खातेधारकांना आणखी नुकसान सहन करावे लागले असते, असेही न्यायालयाने स्पष्ट करण्यात आले आहे.
हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर रिझव्र्ह बँकेने तातडीने पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. त्याविरोधात खातेधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत विविध याचिका केल्या आहेत. तसेच रिझव्र्ह बँकेला पैसे काढण्यावर घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. न्यायालय सध्या या प्रकरणी याचिकाकर्ते आणि रिझव्र्ह बँक यांचा अंतिम युक्तिवाद ऐकत आहे. बुधवारी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालय गुरुवारी रिझव्र्ह बँकेचा युक्तिवाद ऐकणार आहे. व पुढील सुनावणी होणार आहे.