राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भुमिकेवर सामनातून टीकास्त्र…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-112.png)
मुंबई | महाईन्यूज |
23 तारखेला बाळासाबेव ठाकरे यांच्या जयंतीच औचित्य साधत मनसेच्या नव्या झेंड्याचं आनावरण करण्यात आलं ..त्यावेळेस राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचही लॉचिंगही करण्यात आलं. यावेळेस व्यासपिठावर सावरकरांचा फोटोही दिसून आला…तसेच राज ठाकरे यांच्या भाषणातून त्यांची हिंदुत्ववादी भुमिकाही दिसून आली …मात्र या मुद्यावरूनच आता दैनिक सामनातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडण्यात आलंय.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Capture-49.png)
मराठी प्रश्नावर राज ठाकरेंना काही करता आलं नाही. त्यामुळे ते हिंदुत्वावादी मुद्द्याकडे वळले आहेत. पण हिंदुत्व पेलणं हे येरागबाळ्याचा खेळ नाही. असं म्हणत थेट राज ठाकरेंवर टीका कऱण्यात आली आहे. एवढंच नाही तर राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे भाजप असल्याचा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून हाणल आहे. एका महिन्यापूर्वी राज ठाकरेंनी सीएएला विरोध केल्याची आठवणही सामनातून करुन दिली आहे. तसेच अमित शाहांच्या खेळीचे राज ठाकरे बळी ठरल्याचा आरोपही सामनाच्या आग्रलेखातून करण्यात आला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/2-26.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/3-19.png)
दरम्यान, मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनातील आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे त्याचा अर्थ राज ठाकरे बदलला असा होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो. माझी मतंही तीच आहेत जी पूर्वीपासून होती. रंग बदलून मी सरकारमध्ये जाणारा नाही. राज यांनी लगावलेल्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणाने केलं. चोरुनमारुन केलं नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदलला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.