Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : २३ पोलीस, २ पत्रकार पॉझिटिव्ह
![The election of the Speaker of the Legislative Assembly will be held not in secret but in an open manner](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/vidhan-bhavan.jpg)
मुंबई – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनावरही कोरोनाचे सावट आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच कोरोना चाचणी केलेल्या अहवालात २३ पोलीस आणि २ पत्रकार पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अधिवेशनाअगोदर ३२०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अनेक आमदार आणि मंत्र्यांनीचीही चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप कळू शकलेले नाहीत.
वाचा :-अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या राज्यातील जनतेसाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जनतेला दिलासा देणारे कोणते निर्णय सरकार घेणार याकडे लक्ष लागले आहे.