breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,63,799 वर

  • मुंबईत 2,360, पुण्यात 3,886 नवे रुग्ण

मुंबई – जगावर कोसळलेले कोरोना संकट महाराष्ट्रात थैमान घालत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. काल दिवसभरात राज्यात 21 हजार 29 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 12 लाख 63 हजार 799 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 479 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाबळींचा आकडा 33 हजार 886 वर पोहोचला आहे. तर एका दिवसात 19 हजार 476 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 9 लाख 56 हजार 30 इतकी झाली आहे. तसेच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात 2 लाख 73 हजार 477 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बुधवारी 2 हजार 360 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 49 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला. यासह मुंबईची कोरोना रुग्ण संख्या आता 1 लाख 90 हजार 264 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 604 इतका झाला आहे. तसेच मुंबईत आतापर्यंत 1 लाख 54 हजार 88 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून सध्या 27 हजार 63 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात एकूण 3 हजार 886 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील 1 हजार 789 रुग्णांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात दिवसभरात 84 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 61 हजार 683 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 954 इतका झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १३ हजार ५९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button