रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक
मुंबई : येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी पश्चिम रेल्वेवर ५ ऑक्टोबरला मध्यरात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
कुठे – माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग
कधी – स. ११.२० ते दु. ३.५० वा
परिणाम- डाऊन धीमा मार्गावरील उपनगरी रेल्वे माटुंगा ते मुलुंडपर्यंत डाऊन जलद मार्गावर धावतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकात जलद रेल्वे थांबतील. विद्याविहार, कांजुरमार्ग आणि नाहूर स्थानकातील डाऊन धीमा मार्गावर उपनगरी रेल्वे थांबणार नाहीत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत गाडय़ा पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.
हार्बर मार्ग
कुठे- पनवेल ते वाशी दोन्ही मार्ग
कधी- स.११.३० ते सायं. ४.०० वा
परिणाम- सीएसएमटी ते बेलापूर, पनवेल मार्गावर उपनगरी रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल ते ठाणे सकाळी १०.१२ ते दु. ३.५३ आणि ठाणे ते पनवेल सकाळी ११.१४ ते दु.३.२० पर्यंत व पनवेल ते अंधेरी लोकल फेऱ्याही रद्द केल्या आहेत. सीएसएमटी ते वाशीपर्यंत विशेष लोकल फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे – वसई रोड ते भाईंदर दोन्ही जलद मार्ग
कधी- ५ ऑक्टोबर. म.रा. १२.३० ते प. ४.००
परिणाम- ब्लॉकमुळे दोन्ही जलद मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.