‘या’ तारखेला येण्यार दहावी-बारावीचे निकाल ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/ssc-hsc-680x365_c.jpg)
मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBCHSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते.
बोर्डाकडून पेपर तपासण्याचं काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मूल्यांकन पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारण 10 जूनपर्यंत निकाल येईल असा कयास व्यक्त केला जात आहे. हा निकाल विद्यार्थी mahresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात.
अत्यावश्यक सेवांसोबतच बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा, पोलीस, डॉक्टर, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकही आपलं कर्तव्य निभावत आहेत. पेपर तपासण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.