यंदा गोपीनाथ गडावरचा कार्यक्रम रद्द – पंकजा मुंडे
![This year the program on Gopinath fort was canceled - Pankaj Munde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pankaja-munde-.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही. याविषयी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडें यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकाटामुळे गर्दी टाळून सर्वानी आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरवर्षी या दिवशी गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी आणि जन्मदिवशी म्हणजेच 3 जून आणि 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. या गडावर मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटात यावर्षी कार्यक्रम होणार नाही.
यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे कुणीही गर्दी करू नये. 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करून सामाजिक भान राखावे. त्याचबरोबर केवळ रक्तदान शिबिरचा आयोजित करण्याचे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन देखिले त्यांनी कार्यकर्त्याना केले. मी स्वतः 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. त्याचबरोबर मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि माहिती सोशल मीडियावर टाकण्याचे देखील आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.