मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाडेंगी बुल्डोझर सरकार? : अमृता फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Amruta_Fadnavis_1200.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकरविरोधात टीका केली होती.
महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप सुरू झाली आहेत. मग, मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारला होता. यावर मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राउत यांनी प्रत्त्यूत्तर दिले. राउत म्हणाल्या की, ‘आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीस यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही’ विशेष म्हणजे, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस कोण आहेत? असा प्रश्नही उपस्थित केला होता.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारवर पलटवार केला आहे. ‘मेरे पास ना घर न द्वार फिर क्या उखाडेगी बुल्डोझर सरकार?’ असा घणाघात त्यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि सौ. फडणवीस यांच्यात वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे.