breaking-newsमुंबई

मुरबाड रोड परिसरातील ‘ए अँड जी’ खासगी रुग्णालयाचा परवाना रद्द

कल्याण – शासकीय दरांपेक्षा जादा दर आकारून कोरोनाग्रस्त रुग्णांची लुबाडणूक केल्याचा ठपका ठेवत मुरबाड रोड परिसरातील ‘ए अँड जी’ या खासगी रुग्णालयाचा परवाना एक महिन्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने रद्द करण्याची कारवाई पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली आहे. तसेच या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय दर्जाही काढून घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने याचा गैरफायदा घेत ‘ए अँड जी’ रुग्णालयाने केवळ नावे सारखी असल्याने कोरोनाची लागण नसताना एका महिला रुग्णावर कोरोनाचे उपचार करून भरमसाठ पैसे उकळले होते. पालिकेच्या भरारी पथकाच्या पाहणीत या रुग्णालयाने रुग्णाच्या बिलामध्ये ९ लाख ३६ हजार ६१८ रुपये जादा आकारले होते. तसेच टोसिलीझुमॅब इंजेक्शनसाठी एमआरपीपेक्षा जादा पैसे घेतले होते. याबाबत पालिकेच्या नोटीसीला रुग्णालय प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली.

त्यामुळे आता या रुग्णालयाचा परवाना ३१ ऑगस्टपर्यंत रद्द करून कोविड रुग्णालय दर्जाही निलंबित केला आहे. तसेच संबंधित रुग्णाला आकारलेले जादा पैसे परत देत नाही तोपर्यंत नोंदणीचे निलंबन राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान या रुग्णालयाला नवीन रुग्ण घेण्यास मनाई करण्यात आली असून सध्या दाखल असलेल्या रुग्णांवर शासकीय दरातच उपचार केले जाण्यासाठी पालिकेतर्फे वैद्यकीय अधिकारी म्हणून समीर सरवणकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button