breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई महानगरपालिका डबघाईला, बँकेतील ठेवी वापरणार
मुंबई – कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना देशातील सर्वांत श्रीमंत समजली जाणारी महापालिकेचेही आर्थिक कंबरडं मोडलं आहे. महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्न घटल्याने मुंबई महापालिकेला उर्वरित निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागत आहे.
आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे 1300 कोटी रुपयांवर खर्च करण्यात आला आहे. ज्यापैकी 900 कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा 1400 कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे.
जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला 1 हजार कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती आहे.