Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसला अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/bus-4.jpg)
पालघर | बोईसर वरुन बोरिवलीकडे जात असलेल्या एसटी बसला शुक्रवारी (ता.19) साडेअकरा वाजेच्या सुमारास महामार्गावरील बोट उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघात बस चालक,एक प्रवाशी आणि पाच एसटीचे कर्मचारी जखमी झाले असून त्यांना मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बोईसर एसटी डेपोतील बस [MH-20-BL-262] बोरिवलीकडे जात होती.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बोट उड्डाणपुलावर भरधाव कंटेनर चालकाने अचानक ब्रेक घेतल्यान एसटी बस कंटेनरला धडकल्याने अपघात झाला.या अपघातात एसटी चालक राकेश नाईक यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक प्रवाशी असून पाच एसटीचे कर्मचारी होते.जखमींना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.