breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पाऊस

मुंबई – मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. मुंबईत काल रात्रीपासून शहर आणि उपनगरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

वाचा :-#RainAlert: मुबईसह कोकणात पुढचे 3 ते 4 तास ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.

या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाबरोबरच वाल, पावटा, भुईमूग, तूर यासारख्या कडधान्य पिकानाही बसतो आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे . मागील ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. २ दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button