breaking-newsमुंबई

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड आल्याने वाहतूक कोंडी

मुंबई – मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आज सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. यादरम्यान मुंंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर मालाड येथे दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे समजते आहे, याशिवाय रस्त्यावरील एक विजेचा पोलदेखील कोसळून पडला आहे. याठिकाणी आता दरड बाजूला करण्याचे प्रयत्न केले जात असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

पावसामुळे मुंबईतील परेल, हिंदमाता परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. काल रात्रीपासून सुरू असलेला हा पाऊस आणखी 48 तास कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. IMD उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंंबई, ठाणे, व उत्तर कोकणासाठी सध्या रेड अलर्ट देण्यात आला आहे

दरम्यान, आज मुंंबईच्या समुद्रात 12:47 वाजता 4.51 मीटर उंच लाटा उसळणार आहेत, अशा वेळी नागरिकांंनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीचा अंदाज पाहता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कार्यालये व आस्थापने आज बंद ठेवण्याचे आवाहनही महानगरपालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button