मुंबईत धारावी नंतर अंधेरीआणि जोगेश्वरी करोनाचे नवे हॉटस्पॉट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Capture-4.jpg)
मुंबईत सध्या कोरोनाचं प्रमाण वाढतच चाललं आहे. त्यात मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी आणि वरळीत कोरोनाचा प्रसार अटोक्यात येत आहे. मात्र, यानंतर अंधेरी, जोगेश्वरी करोनाचे नवे हॉटस्पॉट ठरत असल्याचं समोर येत आहे.
राज्यात शनिवारी दिवसभरात ३ हजार ७८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील के पूर्व हा अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी परिसर आहे. या परिसरात ७० टक्के भाग झोपडपट्टीचा असून हा भाग दाटीवाटीचा हा. त्यामुळं या भागांत करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. अंधेरी के पूर्व भागात एकाच दिवसात १६६ नवे रुग्ण आढळल्यानं हा भाग सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या भाग ठरतोय. अंधेरी, जोगेश्वरी भागात विमानतळ, एमआयडीसी असल्यानं करोनाच्या संसर्गाची भिती व्यक्त केली जात आहे.
धारावी, माहिम, दादर हा परिसर दुसऱ्या क्रमाकांवर आहे धारावी आणि दादर परिसरात शनिवारी अनुक्रमे १७, १३ आणि १९ रुग्ण आढळले आहेत. कालपर्यंत पहिल्या क्रमांकावर असलेला सर्वाधिक रुग्णसंख्येत दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
मुंबईतील या सहा विभागांत ३ हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळली आहे.
के पूर्व- अंधेरी- जोगेश्वरी- ३७८२
जी उत्तर- धारावी, माहिम, दादर- ३७२९
एल विभाग- कुर्ला- ३३७३
ई विभाग- भायखळा, मुंबई सेंट्रल- ३१४४
के. पश्चिम- अंधेरी पश्चिम- ३१३८
एफ उत्तर- माटुंगा, वडाळा- ३१११