मी मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Devendra-Fadanvis.jpg)
मुंबई | राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून सरकार स्थापन केले. मात्र, अवघ्या दोन दिवसांत ते सरकार कोसळले. त्यावेळी मी मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसायला मला दोन दिवस लागले, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलाखती फडणवीस यांनी त्यांची दु:ख मांडली. राजू परूळेकर यांनी मुलाखतीमध्ये सत्तासंघर्षातील त्या ३६ तासांत नेमके काय काय झाले?, या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले.
राज्याच्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिनाभर राजकीय घडामोडी घडत होत्या. शिवसेनेला बाजूला करत भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन झाले. मात्र, अवघ्या ३६ तासांत ते सरकार कोसळले. यावेळी नेमके काय झाले याचा ऊलघडा फडणवीसांनी परूळेकरांना दिलेल्या मुलाखतीत केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात अशी कल्पना मला केंद्रिय नेतृत्वाने दिली होती. केंद्रिय नेतृत्व मला सारखे तुम्हाला लीड करायचे तुम्हाला लीड करायचेय, असे सांगत होते. त्यामुळे मला कल्पना आली होती की पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. पण आमच्या पद्धतीनुसार ते कुणाला कळू द्यायचे नव्हते.”
“मी मुख्यमंत्री होणार होतो, हे कुटुंबियांनादेखील या बद्दलचे काही सांगायचे नव्हते. अगदी या कानाचे दुसऱ्या कानाला कळू द्यायचे नाही. त्यामुळे मी बाहेर कुणालाही काहीही बोललो नाही. त्यामुळे माझा आनंदही बाहेर दिसू दिला नाही. साहजिक बातमी कळाल्यावर जसा आपल्याला एकदम आनंद होतो ती स्थिती माझ्याबाबतीत काही आली नाही. ”