breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

महिला सुरक्षेशी तडजोड कदापी सहन केली जाणार नाही: नीलम गोऱ्हे

मुंबई | महाईन्यूज

सोशल माध्यमांवरून महिलांना ट्रोलिंग करण्यात येत आहे व तसेच महिलांना बलत्काराच्या धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आहेत. विधिमंडळाच्या सभागृहात सायबर गुन्हे विषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

सोशल मिडीयावर महिलांना ट्रोलिंग करण्याच्या अनके घटना समोर येत आहे. तर बनावट खाते तयार करून महिलांना ट्रोल करून त्यांना धमक्या दिल्या गेल्याचे सुद्धा समोर आलेले आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांबाबत कठोर पावले उचलण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नसल्याचे सुद्धा यावेळी गोऱ्हे म्हणाल्यात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button