मराठा आरक्षण ; सर्वपक्षीय गटनेत्यांची विभानभवनात शनिवारी बैठक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/vidhanbhavan.jpg)
मुंबई – मराठा आरक्षणावरुन राज्यभरात सुरु असलेल्या आंदोलनानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शनिवारी विधानभवनात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ‘सेवासदन’ या निवासस्थानी भाजपाची बैठक पार पडली. या बैठकीनंतरच सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.
विनोद तावडे यांच्या निवासस्थानी रात्री तब्बल तीन तास बैठक सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण, रणजित पाटील, बबनराव लोणीकर उपस्थित होते.
बैठकीनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले की, ‘मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी विधानभवनात विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. सभापती, अध्यक्ष यांच्यासहित सर्व गटनेत्यांची बैठक पार पडणार आहे. वेगवेगळ्या संघटना या आंदोलनात कार्यरत आहेत त्यांच्याशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. त्या सर्वांना चर्चेसाठी बोलवण्यात येणार असून तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल’.