breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘भाजप सांभाळते इतरांनी काढलेली पोरं’ मनसेचा आशिष शेलारांवर पलटवार!

मुंबई : भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’ असे शेलार यांनी ट्विट करत ‘चौकीदार के साईड इफेक्टस’ असा हॅशटॅग वापरला आहे. याला मनसेच्या आयटी सेलने प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याला उद्देशून ‘भाजपमध्ये सांभाळतात इतरांनी काढलेली पोरं’ असा टोला मनसेद्वारे लगावण्यात आला आहे. तर दूसरीकडे शेलार यांच्या या ट्विटला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनीही उत्तर दिले आहे.

‘काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना मंत्रिपद दिलं जायना शिवसेनेविरोधात राबराब राबवले पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले आता यांना यांच्यातलेच कवी ‘आठवले’’ असे ट्विट मुंडे यांनी करत शेलारांवर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button