भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संतापले, रामराजे निबाळकरांना म्हणाले…!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/TUpcHmdN_400x400.jpg)
मुंबई । प्रतिनिधी
विधानसभा उपसभापतींची निवडणूक ऐन कोरोनामध्ये घेतली. यावर संतापलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिले आहे.
तसेच, एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितपणे कमी झाला आहे, असा टोलाही लगावला आहे.
काय म्हणाले आहेत चंद्रकांत पाटील आपल्या पत्रात…
४ वर्षांपूर्वी अपणांस सभापती म्हणून निवडताना, आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतु, आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. परंतु, आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आजप कळस गाठला आहे.
कोरोनामध्ये सभापतीची निवडणुक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात ७८ च्या ऐवजी ६० सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक?
आर्श्चय आहे, एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्या बद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितपणे कमी झाला आहे.
असो, राजकारणात हे चालायचंच…!